27 April 2024 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सामान्यांच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे: चंद्रकांत पाटील

MLA Chandrakant Patil, CM Uddhav Thackeray, Hindutva

पुणे: ‘सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजेच ‘सीएए’मुळे कुणाचं नुकसान होत नाही, या मताशी आपण सहमत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं. ‘हे साप म्हणून भुई बडवण्यासारखे आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते आमच्याशी सहमत झाले असतील, तर त्यांनी राज्यात कायदा अस्तित्वात आणावा. त्याविरोधात सुरु असणारी आंदोलनं थांबवणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ‘सामना’मध्ये तसं जाहीर छापून आलं आहे, त्यांनी ‘मला तसं म्हणायचं नव्हतं’ म्हटलं नाही म्हणजे झालं, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. ही काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. त्याच्या बदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. हा अतिशय आखलेला डाव आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच काँग्रेसने अतिशय प्लॅनिंगने हिंदुत्वापासून शिवसेनेला दूर नेले. त्यात तयार होणारी पोकळी त्यांना राज ठाकरेंच्या मनसेच्या रूपातून भरून काढली वाजणार जाणार आहे. त्यांचा चाहता म्हणून म्हणेल की, तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे.हळूहळू एक शर्ट काढला, पॅन्ट काढली असा प्रयत्न आहे. त्या जागी मनसेला आणण्याचा डाव आहे. हा डाव उद्धवजींनी समजून घ्यावा. ते वारंवार सांगतात की मी हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली होती ? अशी विचारणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काँग्रेस सेवा दलाच्या निवासी शिबिरात वाटलेल्या पुस्तिकेत नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात शारीरिक संबंध असल्याचा खळबळजनक उल्लेख करण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी ही विचारणा केली.

तसेच विधानसभा निवडणुकीनंतर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोकांना माहिती आहे. हे सरकार चालले नाही तर भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. अशावेळी मध्यावधी निवडणूक लागली तर कुणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का, या चर्चेला पुन्हा ऊत येण्याची शक्यता आहे.

 

Web Title:  BJP State President Chandrakant Patil criticized CM Uddhav Thackeray over Hindutva issue.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x