29 April 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Ind vs NZ 2nd Test : भारताचा पहिला डाव २४२ धावांत आटोपला

Indian Cricket team, New Zealand Cricket team

क्राइस्टचर्च : ख्राईस्टचर्च कसोटीतही भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका संघाला बसला आहे. चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ २४२ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा फलंदाजांना सुमार कामगिरी केली मात्र तीन फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीनं भारतानं निदान २००चा आकडा पार केला. पृथ्वी शॉ (५४), चेतेश्वर पुजारा (५४)आणि हनुमा विहारी (५५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवशी सर्वबाद २४२ धावा केल्या. न्यूझीलंडने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र शमी आणि बुमराहनं यांनी दहाव्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून काईल जेमीसनने ५ विकेट घेतल्या.

सलामीवीर मयांकला बोल्टने अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले. विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची नाराजी झाली. साऊथीनं त्याला ३ धावांवरच बाद केले. उप कर्णधार रहाणेनं संघाच्या धावसंख्येत केवळ ७ धावांची भर घातली. जडेजा (९) तर उमेश यादवला खातेही उघडता आले नाही. हे पाच जण वैयक्तिक दोन अंकी धावाही करू शकले नाही. पंत ने १२ धावा केल्या. शमी-बुमराहने दहाव्या विकेटसाठी २२ धावा करत संघाचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत पोहचवला.

 

News English Summery: In the first innings of the second Test against New Zealand, the Indian team made just 242 runs. The Indian team did not have to face New Zealand’s penetrating fish. New Zealand bowlers prevented Indian players from scoring runs.

 

Web News Title: story India vs New Zealand 2nd Test Match Day 1

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x