27 April 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या वंचित विरुद्ध पवार आक्रमक

NCP President Sharad Pawar, Vanchit bahujan Aghadi, Prakash Ambedkar

मुंबई: वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. २६ फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर ४५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.

भदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता. आंबेडकर हे सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत, मनमानी करतात, विश्वासात घेत नाहीत, त्यांची कार्यशैली ही हुकूमशाही प्रवृत्तीची आहे असे आरोप केले होते. या आधीही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.

तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता हा असा आरोप केला होता. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं होतं.

तसेच आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आलं होतं. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला होता. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली होती. अण्णाराव यांच्याकडे ‘वंचित’च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत.

 

News English Summery: Disadvantaged Bahujan alliance leader Prakash Ambedkar is facing another setback. Haridas Bhadhe, the party leader and former MLA, will be joining the NCP today. He will enter NCP in the presence of NCP President Sharad Pawar. He was elected to the Assembly from Akola East. On February 26, he and 45 other office-bearers sent their resignations to Prakash Ambedkar. It was then that he signaled the entry into nationalism. Even before this, many senior leaders have left Prakash Ambedkar. So the deprived have a big push. Bhade had left the party accusing Prakash Ambedkar. It was alleged that Ambedkar does not take everyone along, does not arbitrarily, does not believe in them, his style of work is dictatorial. He had been accused of this earlier. In the last Lok Sabha and Vidhan Sabha elections, the Congress-NCP was hit hard by the disadvantaged.

 

Web News Title: Story setback to VBA Prakash Ambedkar ex MLA will join NCP confirmed after meet with Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x