9 May 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

मुंबई: ताज हॉटेलच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Covid19, Corona Crisis

मुंबई, १२ एप्रिल: मुंबईत कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. अशात दक्षिण मुंबईतील पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. ताज हॉटेलमधील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. दक्षा शहा यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना, ताज हॉटेलच्या तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तर करोनाची लक्षणे असलेल्या ताजच्या काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ताजच्या ४ कर्मचाऱ्यांना ८ एप्रिल रोजी तर आणखी दोन कर्मचाऱ्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ताज हॉटेलचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व ज्यांच्यात करोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

 

News English Summary: The outbreak of corona virus is on the rise in Mumbai. The number of patients and casualties is increasing day by day. Corona patients have been found at the five-star Taj Mahal Palace Hotel in south Mumbai. Corona suffers 6 employees at Taj Hotel All of them are undergoing treatment at a private hospital in Mumbai.

News English Title: Story six employees of Mumbai Taj Hotel test positive for Corona virus Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x