29 April 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

अमेरिकेत बेरोजगारीच्या लाभासाठी करोडो अर्ज; ५ आठवड्यात २.६ कोटी अर्ज

Corona Crisis, Covid 19, America unemployment

वॉशिंग्टन, २४ एप्रिल: जगभरात करोना व्हायरसमुळे १ लाख ९० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये दोन-तृतीयांश मृत्यू झाले आहेत. १,९०,०८९ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. २६ लाखापेक्षा जास्त नागरिक करोनाबाधित आहेत. युरोप खंडाला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी खूप मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमेरिका कदाचित पुन्हा कधीही जागतिक आरोग्य संघटनेला अर्थसहाय्य करणार नाही, ‘जर गरज भासली तर ते आरोग्यावर आपली एक जागतिक संस्था तयार करतील.’ कोरोनाच्या बाबतीत चीनला पाठिशी घातल्याचा आरोप करत अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला निधी देणे बंद केले आहे. आता माईक पोम्पीओ यांनी त्यापेक्षा आणखी आक्रमक भूमिकेचे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

दुसरीकडे ट्रम्प सरकारने आर्थिक नियोजन आणि लवकरच ओढवणाऱ्या बेरोजगारीवर उपाय योजना सुरु केल्या आहेत आणि त्यासाठी मोठी आर्थिक पॅकेजेस जाहीर करण्यात आली आहेत. अमेरिकेत जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर १९३० च्या महामंदीनंतर सर्वाधिक झाला आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेने सुमारे ५०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.

यावर सरकारने सांगितले की, मागील आठवड्यात ४४ लाखांहून अधिक लोकांनी बेरोजगारीच्या लाभासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर मागील पाच आठवड्यात सुमारे २.६ कोटी लोकांनी यासाठी अर्ज केला आहे. यावरून जगातील स्थिती काय असेल याचा अंदाज येऊ लागला आहे.

 

News English Summary: The US Congress has approved a 500 500 billion package to tackle the financial crisis. More than 44 lakh people have applied for unemployment benefits in the past week, the government said. In the last five weeks, about 2.6 crore people have applied for it.

News English Title: Story In America unemployment benefits corona virus Covid 9 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x