28 April 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मागील २४ तासांत १८१ पोलिस कोरोनाबाधित; तर ३ पोलिसांचा मृत्यू

Corona Virus, Covid 19, Maharashtra Police, Mumbai Police

मुंबई, २९ मे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १८१ पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर ३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २ हजार २११ पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत. आतापर्यंत एकूण २५ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर ९७० पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, राज्यात आज ८५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईत सर्वाधिक ३८ जणांचा जणांचा बळी गेला आहे. वसई-विरार आणि ठाण्यात प्रत्येकी ४, नवी मुंबईत दोन, जळगाव, रायगड, नांदेडमध्ये प्रत्येकी एक, पुण्यात १०, सातारा ९, सोलापूर, औरंगाबाद ३ आणि अकोल्यात ५ जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये ६० पुरुषांचा आणि २५ महिलांचा समावेश होता. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील ४५ रुग्णांचा समावेश होता. ४० ते ५९ वयोगटातील ३१ रुग्ण तर ४० वर्षाखालील ९ रुग्ण होते. या ८५ मृत रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग अशा स्वरुपाचे अति जोखीमेचे आजार आढळले होते.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील होते. तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील होते. या कालावधीत ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर ५, अकोला ४, औरंगाबाद, सातारा, ठाणे आणि वसई-विरार येथे प्रत्येकी ३, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे आणि रायगड येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूचा समावेश होता, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing day by day. Police officers deployed for his safety are also trapped in the corona. In the last 24 hours, 181 police officers have been killed in the state. So 3 policemen have died due to corona.

News English Title: Corona virus last 24 hours 181 police officers have been tested positive 3 policemen died News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x