26 April 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ठाकरे सरकारची १०० कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस

Raigad, 100 Crore Relief Fund, Fund inadequate, Devendra Fadnavis

मुंबई, ६ जून: राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा कोकणात – नाशिकमध्येही नुकसान झालं होतो. तेव्हा आम्ही विशेष जीआर काढून एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत देण्याचे निर्णय घेतले होते. सांगली – कोल्हापूरसाठी आपण ४७०८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं होतं. कोकण नाशिक करता २१०५ कोटी रुपयांचे पॅकेज दिलं होतं. आताच्या सरकारनेही अशीच मदत जाहीर करणे आवश्यक आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता” असे ते म्हणाले. “३७० रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे बोलले जायचे. पण असे काही घडले नाही उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरु झाली” असे त्यांनी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्र सरकारचे चांगले निर्णय असल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: The state government’s Rs 100 crore assistance to Raigad, the worst hit by the cyclone, is inadequate. Opposition leader Devendra Fadnavis today demanded that 75 per cent of the aid should be declared to the victims.

News English Title: The state governments 100 crore assistance to Raigad the worst hit by the cyclone is inadequate News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x