5 May 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

होम कोरंटाईनच्या संपर्कात आल्याने सेनेचे सिब्बल अनिल परब यांनी काळजी घ्यावी - आ. नितेश राणे

Minister Anil parab, MLA Nitesh Rane, Home Quarantine

कणकवली, ८ जून: राज्यातील कोकणात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात कोकणासाठी कोरोना टेस्टसाठी देखील विशेष सोय नाही आणि त्यामुळे अडचणी वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांना होम कोरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करताना धक्कादायक माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ज्यांना होम कोरंटाईन करण्यात आलं होतं ते राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या कोअर टीमसाठी मोठा धक्का आहे आणि विशेष करून मातोश्रीच्या!! शिवसेनेच्या सिब्बल यांनी काळजी घ्यावी…असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

News English Summary: Shiv Sena ZP member who has been home quarantined comes in contact with Minister Anil Parab, who is a member of Maha CMs kitchen cabinet now this might lead to some major trouble in the Maha CMs core team n specially Matoshree! Sena ka Sibal shud take care said MLA Nitesh Rane News Latest Updates.

News English Title: Shiv Sena ZP member who has been home quarantined comes in contact with Minister Anil Parab said MLA Nitesh Rane News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x