8 May 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी
x

देशात समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारने स्वीकारावं, तज्ज्ञांनी सूचना

Community Transmission, Covid 19, India

मुंबई, १३ जून: देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर राहिला आहे.

शनिवारी (13 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 308993 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आठ हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 145779 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, देशात समूह संसर्ग झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. सरकारच्या अडथळ्यामुळे हे सत्य स्वीकारलं जात नाही. समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारनं स्वीकारावं, जेणेकरून लोक गैरसमजात राहणार नाही, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. चार टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडं करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, आयसीएमआरनं हा दावा फेटाळून लावला होता. आयसीएमआरनं वृत्त फेटाळल्यानंतर देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देशातील अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असल्याचा दावा केला आहे. ‘पीटीआय’नं हे वृत्त दिलं आहे.

‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी आयसीएमआरनं केलेल्या पाहणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशातील अनेक भागात समूह संसर्ग झालेला आहे, यात कसलीही शंका नाही. देशातून लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व लोकांची गर्दी बाहेर पडू लागल्यानं रुग्णांची संख्या वेगात वाढली आहे. त्याचबरोबर ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं आहे. आयसीएमआरच्या पाहणीत सध्याची परिस्थिती दिसून आलेली नाही. सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील,” असं मिश्रा यांनी सांगितलं.

विषाणूशास्त्रज्ञ शहीद जमील म्हणाले,”देशात समूह संसर्गाला खूप आधीच सुरूवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा ही गोष्ट मान्य करत नाही, ही वेगळी बाब आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आयसीएमआरनं स्वतः केलेल्या पाहणीत हे दिसून आलं आहे. करोना बाधित निघालेले ४० टक्के रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही. त्याचबरोबर ते करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याचीही नोंद नाही. जर हा समूह संसर्ग नसेल, तर मग काय आहे?,” असा सवाल जमील यांनी केला आहे.

 

News English Summary: Experts claim that there is a mass infection in the country. This fact is not accepted due to government obstruction. Experts have advised the central government to accept the fact that the group has been infected so that people do not remain misunderstood.

News English Title: Community Transmission Of Covid 19 On In Many Parts Of India News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x