27 April 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपच्या खेळीने सचिन पायलट यांच्याकडे नवा पक्ष अथवा तिसरी आघाडी हेच पर्याय

Sachin Pilot, Congress MLA,

नवी दिल्ली, १३ जुलै : मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात बिनसले आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर राजस्थानातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. त्यानंतर काँग्रेसने रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितले की, ‘१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.’

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी भाजपा आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आपल्या समर्थनार्थ पत्र लिहिण्यास त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना सांगितले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला.

सचिन पायलट यांची तिसरी आघाडी बनवण्यामागे अनेक महत्त्वाच्या बाजू समोर येत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सचिन पायलट यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या इतकी जास्त नाही जेणेकरुन काँग्रेस सरकार पडेल. अशोक गहलोत वारंवार काँग्रेस आमदार आणि पार्टीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसने आमदारांना व्हिप जारी केला आहे. ज्यात पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सहभागी व्हावं लागेल. जे या बैठकीला हजर राहणार नाहीत अशांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थिती सचिन पायलट तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारु शकतात.

दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.

 

News English Summary: Sachin Pilot has the support of 30 Congress MLAs, and if he gets the support of these MLAs and forms a third front, the government of Chief Minister Ashok Gehlot could suffer. But to form a third group, they will need the support of one-third of the Congress MLAs.

News English Title: Sachin Pilot has the support of 30 Congress MLAs could forms a third front News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x