26 April 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

IPL 2020 | RR vs CSK | राजस्थानला धक्का | संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत

IPL 2020, RR vs CSK Team, Cricket Match, Marathi News ABP Maza

अबुधाबी, २२ सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.

वडील कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे स्टोक्स जवळपास अर्ध्या स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत, तर बटलरने स्वतंत्र प्रवास केल्यामुळे ३६ तासांच्या विलगीकरणानंतरच त्याला स्पर्धेत खेळता येईल. याचप्रमाणे स्मिथ इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून सावरत असून, त्यामुळे राजस्थानच्या संघाचा समतोल बिघडला आहे.

याआधी राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील दुखापतग्रस्त झाला होता. मात्र स्मिथ खेळणार असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघानं मुंबईला हरवले होते. चेन्नईकडून अंबाती रायडू आणि फाफ ड्यु प्लेसिस यांनी चांगली कामगिरी केली होती.

तर, दुसरीकडे रॉयल्सची कामगिरी मुख्यत्वे परदेशी खेळाडूंवर असते. गोलंदाजीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅन्ड्र्यू टाय यांच्यावर जबाबदारी असेल. तर, फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरवर सर्वांच्या नजरा असतील. त्याचबरोबर संघात संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, वरुण अॅरॉन असे भारतीय खेळाडूही आहेत, ज्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

 

News English Summary: IPL 2020, RR vs CSK Team Predicted Playing 11 for Today Match LIVE Updates: Rajasthan Royals skipper Steve Smith, who got hit on the head during net session before the first ODI in Manchester and missed the whole series on advice of Cricket Australia’s medical team, is all set to return to action during his team’s opening IPL contest against Chennai Super Kings on Tuesday, having successfully recovered from the concussion injury sustained prior to ODI series against England.

News English Title: IPL 2020 RR vs CSK Team Predicted Playing 11 for Today Match Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x