26 April 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करणारे बिहारचे DGP निवडणुकीच्या रिंगणात

Bihar DGP Gupteshwar Pandey, Bihar Assembly Election 2020, NDA, Marathi News ABP Maza

पटणा, २३ सप्टेंबर : बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या वतीने राज्यपालांनी पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला आहे.

मागील काही दिवसांपासून पांडे हे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे ही बिहारमधील मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे.

पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु होती. मात्र आता पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

 

News English Summary: Gupteshwar Pandey, after quitting as Bihar police chief last evening, said today that his decision had nothing to do with the Sushant Singh Rajput case, which has become a political talking point ahead of the state’s election just weeks away. Mr Pandey’s request for voluntary retirement was approved on Tuesday by the Bihar government, which has waived a three-month mandatory cooling off period.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Governor Approves The Request Of DGP Gupteshwar Pandey Seeking Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x