27 April 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्यांनी कृषी विधेयके निष्प्रभ करावीत | सोनिया गांधींचे निर्देश

Congress, President Sonia Gandhi, Agriculture Bills, Farm Bills

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर : केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता शेतकर्‍यांनी कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर एक ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांना मिळालेली देहदंडाची शिक्षा आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. तसेच, विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये या कायद्यांविरोधात विधानसभेमध्ये प्रस्ताव संमत करण्यात येणार असल्याचे समजते. यात छत्तीसगढ आघाडीवर असेल असे सांगण्यात येते.

दरम्यान, कृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या अधिकारात निष्प्रभ करावे,असे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रतापन यांनी एका कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर आज पंजाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटपाशी राजपथावर ट्रॅक्टर पेटवून या कायद्यांचा रस्त्यावर निषेध नोंदविला.

तसेच शेतकरीविरोधी कायद्यांमध्ये आधारभूत किंमतीचा उल्लेख का केला नाही, असा सवाल करीत ट्रॅक्टर पेटवल्याने जनतेला या कायद्यांविरुद्धचा शेतकऱ्यांचा रोष दिसला आहे, अशा शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी समर्थन केले.

 

News English Summary: Sonia Gandhi asked Congress ruled states to consider bringing laws to overrule the centre’s farm laws, which have provoked massive farmer protests in parts of the country. Congress ruled Punjab is the epicenter of protests against the three controversial laws and its Chief Minister Amarinder Singh held a sit-in today, joining the cause of the farmers.

News English Title: Congress President Sonia Gandhi asks congress ruled states to override Centres farm laws Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x