27 April 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

यूपीत बलात्काराचं सत्र सुरूच | भदोही जिल्ह्यात दलित महिलेवर सामूहिक बलात्कार

Dalit woman, gang raped, Uttar Pradesh, Bhadohi district

भदोही, ५ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच उत्तर प्रदेशातीलच भदोही जिल्ह्यात ज्ञानपूर भागात एका ४४ वर्षीय दलित विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी सांगितले की या महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितले की, या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, ही दलित महिला शनिवारी बँकेतून पैसे घेऊन घरी जात होती. रस्त्यात धनंजय शुक्ला, अजय शुक्ला यांनी तिला सांगितले की, आम्ही तुला घरी सोडतो. मात्र, त्यांनी तिला रायपूर गावातील एका बागेत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. धनंजय शुक्ला, अजय शुक्ला, सोनू उपाध्याय आणि विकास शुक्ला या चार जणांनी अत्याचार केल्याचा आरोप महिलेच्या पतीने तक्रारीत केला आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत असून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी योगी सरकारला सल्ला दिला आहे.

बसपाच्या नेत्या मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास मजबूर केलं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: A 44-year-old Dalit woman was allegedly gangraped by four men in Uttar Pradesh’s Bhadohi. Out of the four accused, two have been arrested. The incident took place in Bhadohi’s Gyanpur area, police said on Sunday. Superintendent of Police Ram Badan Singh said a case has been registered against the accused based on a complaint lodged by the victim’s husband, according to PTI report.

News English Title: Dalit woman gang raped again Uttar Pradesh Bhadohi district Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x