11 May 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

VIDEO | भारतातही पडसाद | फ्रांस अध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये हजारो लोक जमले

Protest, France President Emmanuel Macron, Bhopal Madhya Pradesh

भोपाळ, ३० ऑक्टोबर: फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नाइस शहरात (Nice knife attack) एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली होती.

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला होता. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हो अकबरचे नारे दिले. रॉयटर्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं होतं. नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचंच म्हटलं होतं. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. फ्रान्सच्या एका मंत्र्यानेही महिलेची गळा चिरून हत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दुसरीकडे भारतातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. मोहम्मद पैगंबर संबंधात भाष्य करणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भोपाळमध्ये जोरदार प्रदर्शनं करण्यात आली आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेल्या विधानाविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी झालेल्या निषेधावर शिवराजसिंग चौहान यांनी कठोर भूमिका घेत आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. गुरुवारी मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येऊन फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात निदर्शनं केली होती.

गुरुवारी भोपाळच्या इक्बाल मैदानावर करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते. भोपाळ सेंट्रलचे काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी हे आयोजन केलं होतं. हातात बॅनर, पोस्टर्स आणि फलक लावून निदर्शकांनी घोषणाबाजी केली. भोपाळच्या पोलीस ठाण्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: Police in Bhopal booked around 200 people, including Congress MLA Arif Masood, as thousands of Muslims protested against French President Emmanuel Macron’s alleged remarks against ‘Islamist separatism’ at the historic Iqbal Maidan on Thursday. The protesters held placards and raised slogans against Macron, led by Masood at the monument in Bhopal’s Old City. They demanded an apology from Macron for his remarks.

News English Title: Protest against France President Emmanuel Macron in Bhopal Madhya Pradesh News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x