27 April 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्य सरकारकडून २२९७ कोटी वितरित करण्याचा आदेश | शेतकऱ्यांना दिलासा

Farmers relief package, distribution started, MahaVikas Aghadi government

मुंबई, ९ नोव्हेंबर: महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर सुखद बातमी मिळाली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी एकूण २२९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे अधिकृत आदेश आज राज्य शासनाकडून काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून एकूण १०,००० कोटींची नुकसानभरपाई देण्यासाठी पॅकेज जाहीर केले होते.

आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जे दहा हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, त्यापैकी आज एकूण 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे.

दिवाळीपूर्वी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देखील दिले जातील असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, परंतु अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली आहे.

मात्र, आम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मागून ही मदत देत आहोत. काल काही बातम्यांमध्ये विदर्भाच्या वाट्याला केवळ आठ कोटी असा उल्लेख होता, त्यात कोणतही तथ्य नाही. उलट विदर्भाला एकूण 566 कोटींचा निधी देणार आहोत, असंही विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात एकूण 4 हजार 700 कोटी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: The good news has finally arrived for the affected farmers who are waiting for the financial help of the Mahavikas Aghadi government. Official orders have been issued by the state government today to disburse a total of Rs 2,297 crore 6 lakh 37 thousand in the first installment of compensation to the farmers affected by the heavy rains and floods in various districts from June to October. Chief Minister Uddhav Thackeray had visited the flood-hit area and announced a total compensation package of Rs 10,000 crore.

News English Title: Farmers relief package distribution is started from MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x