29 April 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती

Sheetal Amte Karajagi, suicide case, Police report

मुंबई, ३० डिसेंबर: ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. (Sheetal Amte Karajagi suicide case report what police said)

शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला तब्बल महिनाभरानंतरही पोलीस तपासात अल्प प्रगती पाहण्यास मिळाली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शीतल आमटे यांचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पण, डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची माहिती ही त्यांनी दिली.

शीतल यांचा मृत्यू झाला त्या खोलीतून नेक्युरोन इंजेक्शनचे अ‍ॅम्पुल व सिरिंज मिळाले आहे. शीतल यांच्या उजव्या हातावर इंजेक्शनचे मार्क दिसून आले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट, मुद्देमाल, व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. या सर्व वस्तू रासायनिक परिक्षणकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर व नागपूर या ठिकाणी पाठविल्या आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी पाठविल्या आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.

 

News English Summary: New information has come to light regarding the suicide of Dr. Sheetal Amte-Karjagi, granddaughter of the late Baba Amte and CEO of Maharogi Seva Samiti. Earlier, shocking information has come to light that Sheetal Amte had attempted suicide. Also, the possibility of an assassination attempt has been ruled out.

News English Title: Sheetal Amte Karajagi suicide case report what police said news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x