11 December 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

आत्महत्येच्या दिवशी सुशांत दुबईच्या ड्रग डीलरला भेटला होता

Bollywood actor Sushant Singh Rajput, BJP leader Subramanian Swamy, Dubai drug dealer

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत असताना आता भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘आत्महत्या झाली त्या दिवशी सुशांत सिंह राजपूत दुबईच्या एका ड्रग डिलरला भेटला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमध्ये दुबईच्या ड्रग डिलरचं कनेक्शन आहे’, असं सुब्रह्मण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी त्यासंदर्भात एक ट्वीट करून सवाल उपस्थित केला आहे. शिवाय, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची तुलना त्यांनी सुनंदा पुष्कर आणि श्रीदेवी यांच्या प्रकरणांशी देखील केली आहे. त्यामुळे आता सुशांतच्या प्रकरणाला या दाव्यातून एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले सुब्रह्मण्यम स्वामी?
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये संबंधित ड्रग डिलरचं नाव देखील देण्यात आलं आहे. ‘सुनंदा पुष्कर प्रकरणामध्ये AIIMS च्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात काय सापडलं होतं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. पण अभिनेत्री श्रीदेवी किंवा सुशांतसिंहच्या प्रकरणात असं काहीही घडलेलं नाही. सुशांतच्या प्रकरणामध्ये दुबई कनेक्शन आहे. दुबईचा ड्रग डिलर आयश खान आत्महत्येच्या दिवशी सुशांतला का भेटला होता?’ असा सवाल सुब्रह्मण्यम स्वामींनी उपस्थित केला आहे.

 

News English Summary: Late Bollywood actor Sushant Singh Rajput had met a Dubai compliant drug dealer on the day he was murdered, BJP Rajya Sabha MP Subramanian Swamy has alleged in a tweet on Monday.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput suicide BJP leader Subramanian Swamy claims Dubai drug dealer connection News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x