26 April 2024 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष ईडीच्या रडारवर | विवा ग्रुपवर ईडीची छापेमारी

ED raided, Viva Group, MLA Hitendra Thakur

विरार, २१ जानेवारी: सध्या महाविकास आघाडीतील नेते मंडळी ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळालं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर ईडीचा मोर्चा भाजपाला राम राम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर तेही पाहायला मिळालं आहे.

आता महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे इतर छोटे पक्ष देखील ईडीच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळतंय. कारण महाविकास आघाडीला तीन आमदारांचा पाठिंबा देणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसेवा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ईडीने मोठी कारवाई सुरु केली आहे.

ईडीने PMC बँक घोटाळा प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निमित्ताने ही कारवाई केली असल्याचीही चर्चा सुरू आहे.

 

News English Summary: The ED has raided various offices of the famous Viva Group in the area in this regard. Apart from this, raids are also going on in some other places. It is learned that the raid is still going on. Importantly, this is the Viva Group of Hitendra Thakur, President of Bahujan Vikas Aghadi and MLA of Vasai. So many have raised eyebrows after this raid. Discussions are also going on that this action has been taken on the occasion of the upcoming Vasai Virar Municipal Corporation.

News English Title: ED has raided various offices of the famous Viva Group related to MLA Hitendra Thakur news updates.

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x