27 April 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलन | संजय राऊत आज शेतकरी आंदोलकांना भेटणार

ShivSena, MP Sanjay Raut, Agitating farmers, Ghazipur border

नवी दिल्ली, ०२ फेब्रुवारी: केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान, आज (२ फेब्रुवारी) शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गाझीपूर सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी बांधवांना दुपारी १ वाजता भेटणार आहेत.

याची माहिती राऊत यांनीच ट्वीट करून दिली आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलकांना भेटणार असल्याचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

 

News English Summary: Farmers have been protesting in Delhi for more than two months against the central government’s three agricultural laws. Everyone also saw the violent turn of the movement on Republic Day. But even after that, the farmers are quietly protesting once again. An agitation was also organized in Maharashtra to support his movement. Meanwhile, today (February 2) Shiv Sena MP Sanjay Raut will meet the agitating farmers on the Ghazipur border at 1 pm as per the order of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: Shiv Sena MP Sanjay Raut will meet the agitating farmers on the Ghazipur border news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x