2 May 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

प्रादेशिक पक्षात देशात सेनेला सर्वाधिक देणग्या, सर्वाधिक देणगीदार बांधकाम क्षेत्रातील

नवी दिल्ली : सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला शिवसेना पक्ष हा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली असल्याचे २०१६-१७ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अधीकृत रित्या उघड झालेल्या देणगीदारांच्या यादीत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आलं आहे.

शिवसेनेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून सत्तेत असल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. कारण या देणगीदारांमध्ये सर्वाधिक संख्या ही बांधकाम व्यवसायाशी संबंधित कंपन्यांची आहे. त्यामध्ये रोमा बिल्डर्स प्रा. लि, नहार बिल्डर्स, ओंकार रिअ‍ॅल्टर, कल्पतरू प्रॉपर्टीज, पॅलाडियम कन्स्ट्रक्शन, भैरवनाथ शुगर वर्क्‍स लि., रुबी मिल्स अशा मंडळींचा बडय़ा देणगीदारांत समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावली प्रमाणे देशातील सर्वच पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा ताळेबंद निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. त्या संबंधित २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदात ही बाब उघड झाली आहे.

शिवसेनेला कोणी किती देणग्या दिल्या आहेत त्याची अधिकृत आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

रोमा बिल्डर्स प्रा. लि : ५ कोटी
भैरवनाथ शुगर वर्क्‍स लिमिटेड : ४ कोटी
मॉडर्न रोड मेकर्स प्रा. लि : २ कोटी
ए. एन. इंटरप्रायजेस इन्फास्ट्रक्चर सव्‍‌र्हिस प्रा. लि : २ कोटी
कल्पतरू प्रॉपर्टीज लि : ५५ लाख
जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि : २५ लाख
पॅलाडियम कन्स्ट्रक्सन्स प्रा. लि. : ६ लाख
ओंकार रिअ‍ॅल्टर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स : ४ लाख
नहार बिल्डर्स : १ लाख
असे तब्बल ७१ कॉर्पोरेट देणगीदारांनी एकूण १८ कोटी ३ लाख ४ हजार ७०१ रुपयांची देणग्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी शिवसेनेला दिल्याचे पक्षाने निवडणूक आयोगा पुरविलेल्या माहितीत समोर आलं आहे.

कोर्पोरेट देणगीदारां व्यतिरिक्त वैयक्तिक देणगीदारांकडून आणि विविध संस्थांकडून शिवसेनेला तब्बल ७ कोटी ८१ लाख मिळाल्याचे सुद्धा या आकडेवारीत समोर आलं आहे. विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत मुंबई महानगर पालिकेशी संबंधित कंत्राटदार यांचा अर्थातच कॉर्पोरेट आणि वैयक्तिक व छोटय़ा व्यावसायिक देणगीदारांमध्ये समावेश दिसत आहे. देशात शिवसेने खालोखाल दिल्लीतील आप या पक्षाचा क्रमांक लागतो.

त्यामुळे शिवसेना सत्तेत आल्यानंतर वाढलेल्या महागाईने सामान्य जनतेचा खिसा जरी रिकामा होत असला तरी सत्ताधाऱ्यांचे खिसे मात्र पैशाने तुडुंब वाहताना दिसत आहेत असच ही आकडेवारी सांगते.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x