27 April 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तपासाला वेग | ठाणे पोलिसांना मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं

Thane police, Mobile Last location, Mansukh Hiren

मुंबई, ०६ मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. मात्र या अहवालात मृत्यू कसा झाला याचा उल्लेख नाही. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. इकडे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा-रेतीबंदर या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. पोस्टमाॅर्टेम अहवाल घेऊन ठाणे पोलिसांचे पथक हिरेन यांच्या नौपाडा येथील घरी गेेले. त्यानंतर सायंकाळी मनसुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Thane police have traced the last location of Mansukh Hiren’s mobile)

तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी तपासकामाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला. शनिवारी सायंकाळी ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. नगराळे यांनी तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती दिली. दीड-पावणेदोन तास ही बैठक चालली.

 

News English Summary: Thane police have traced the last location of Mansukh Hiren’s mobile. According to him, he was found in a village in Vasai at 10.30 pm on Wednesday. So which village did Hiren go to in Vasai? Why did you go Who did they meet there? What did you discuss with the people you met? Such a question is being asked and the mystery about it has increased even more. Meanwhile, police have started an investigation in this regard, sources said.

News English Title: Thane police have traced the last location of Mansukh Hiren’s mobile news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x