2 May 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

नाशिक मनसे | सचिन भोसले यांना मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून हटवलं | कारण...

MNS, Raj Thackeray, Sachin Bhosale, Nashik MNS

मुंबई, १२ मार्च: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात गटबाजीच्या राजकारणाला आधीच पूर्णविराम देण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. राज ठाकरे यांनी यानिमित्तानेच काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांचे अहवाल मागविले होते. त्यालाच अनुसरून आता महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.

पुण्यानंतर त्याचा दुसरा प्रत्यय हा नाशिकमध्ये आला आहे. जुन्या चुकांकडे दुर्लक्ष केल्याने पक्षाला नाशिक महानगरपालिकेत किंमत मोजावी लागली होती. नाशिक मनसेतील महत्वाचे पदाधिकारी सचिन भोसले यांना मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून दूर करण्यात आले आहे. त्याला कारण ठरलं आहे ते राज ठाकरेंकडे आलेल्या तक्रारी म्हणता येईल. विशेष म्हणजे सचिन भोसले हे नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे अशोक मुर्तडक यांना देखील पक्षाने व्यक्तिकेंद्रित राजकारण न करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

शिवसेनेशी जवळीक असल्याच्या पक्षांतर्गत तक्रारी:
प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनेसच्या ॲड. वैशाली भोसले यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळी पक्षाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याला विचारात घेतले गेले नाही. मुंबई महामार्गावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाफलकांवर सचिन भोसले यांचे छायाचित्र असल्याची बाब राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. स्थायी समिती सदस्याची नियुक्ती करताना पक्षाकडून आलेले शिरीष सावंत यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याची तक्रार राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचविण्यात आली होती. माजी आमदार नितीन भोसले यांनी मनसे भाजपयुक्त झाल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी केल्याची बाब पक्षनेतृत्वाला खटकली. मनसेच्या वर्धापन दिनाला नाशिकहून गेलेल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी भोसले यांच्यासंदर्भात तक्रारी केल्याचे बोलले जाते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भोसले यांना पदावरून हटविल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या तोंडावर भोसले यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनसे पक्षसंघटनेत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सध्या तरी सचिन भोसले यांनी विषय गांभीर्याने न घेता, आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन अशी प्रतिक्रिया दिली असली तरी भविष्यात नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे. मात्र त्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये अजून कोणते बदल करणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: The party had to pay the price in Nashik Municipal Corporation for ignoring the old mistakes. Sachin Bhosale, an important office bearer of Nashik MNS, has been removed from the post of Central Assembly Inspector. The reason for this can be said to be the complaints received by Raj Thackeray. In particular, Sachin Bhosale is considered a staunch supporter of former Nashik mayor Ashok Murtadak. Therefore, the party has also indirectly warned Ashok Murtadak not to engage in person-centered politics.

News English Title: MNS Chief Raj Thackeray removed Sachin Bhosale from important role in Nashik MNS news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x