27 April 2024 8:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health First | घामोळ्यांनी त्रासले आहेत तर करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा

home remedies for prickly heat rashes

मुंबई २४ एप्रिल : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाळा ऋतू तापदायक असतो. या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरुपात त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी घामोळ्यांमुळे जीव अक्षरशः हैराण होतो. संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो. गरम-दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. काही कारणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे पूर्णतः बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे घामोळ्या, लाल पुरळ शरीरावर येतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये घर्मग्रंथीची वाढ पूर्णतः झालेली नसते. त्यामुळे लहान मुलांना जास्त प्रमाणात घामोळ्यांचा त्रास होतो. घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता
.
कच्चा बटाटा –
कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण २० मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा.

चंदन पावडर –
चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही फायदा होतो.

बेकिंग सोडा –
बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून चार वेळा केल्याने चांगले परिणाम मिळतात.

मुलतानी माती –
मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.

कडूलिंब –
कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

News English Summary: Summer is hot for everyone from young to old. Severe skin disorders, along with other ailments, have to be dealt with this season. No matter how much care is taken, sweating literally annoys the organism. Acne can have serious psychological consequences, especially for men. Ignoring this can lead to serious skin disorders. You can solve this problem with simple home remedies

News English Title: Home remedies for prickly heat rashes new update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x