2 May 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Health First | चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यास हितकारक आहे ते कसे जाणून घ्या

benefits of eating jawar roti

मुंबई २७ एप्रिल : ज्वारीच्या भाकरीचे फायदे खूपच गुणकारी आणि आरोग्यदायी असे आहेत.पचायला हलकी आणि आरोग्यदायी अशा ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने त्याचे खूप आरोग्यदायी फायदे तुम्हाला होऊ शकतात. ज्वारी ही तंतूमय पदार्थ असल्याने पोट साफ राहते. मुंबईत सहसा भाकरी जास्त बनवत नाही. कारण मुंबईच्या वातावरणात ती जास्त पचतही नाही. मात्र गावाकडे आजही ज्वारी, बाजरीच्या भाकरीला महत्व आहे. गावाकडे चपातीपेक्षा भाकरी हा प्रकार जास्त पाहायला मिळते कारण तेथील वातावरणही त्यासाठी पोषक असते. मात्र कोणत्याही वातावरणात पचण्यास हलकी असते ज्वारीची भाकरी.

याच आरोग्यदायी ज्वारीचे फायदे आपण जाणून घेणार आहोत…

भरपूर कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण:
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा शरीरात अभाव जाणवतो.

ज्वारीच्या सेवनानं होणारे फायदे:

1. सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

2. वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.

3. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

4. ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

5. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

6. ज्वारी शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

7. ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.

8. ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा…

News English Summary: The benefits of jawar roti are very beneficial and healthy. Incorporating jawar roti in the diet which is light and healthy to digest can bring you many health benefits. Jawar is a fibrous substance which keeps the stomach clean. In Mumbai, roti is not usually made much. This type of roti is more common in the village than chapati because the environment is also conducive to it. But jawar roti is easy to digest in any environment.

News English Title: Eating jawar roti is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x