20 May 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

केंद्र सरकारचे प्रयत्न अपुरे, कामगार-मजुरांना योजनांचा लाभ मिळत नाही, आम्ही समाधानी नाही - सुप्रीम कोर्ट

India corona pandemic

नवी दिल्ली, २४ मे | देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू कमी होताना दिसत आहे. देशात रविवारी 2 लाख 22 हजार 704 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 संक्रमितांची नोंद झाली आहे. तर, रविवारी 4,452 संक्रमितांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 2 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे. मागच्या वर्षी 13 मार्चला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. यानंतर 14 महीन्यातच 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 3 हजार 751 रुग्णांचा या महामारीने जीव घेतला आहे. याच दरम्यान अनेक राज्यातील लॉकडाऊनमुळे कामगार आणि मजुरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

दुसरीकडे, देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी तुम्ही करत असलेले प्रयत्न अपुरे असून, आम्ही याबाबत समाधानी नाही, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, कामगार नोंदणी योजनेविषयी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर, कामगारांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही प्रक्रिया गतिमान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कामगार, मजुरांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. ती गतिमान होणे आवश्यक आहे. जेणेकरून स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकेल. परंतु, नोंदणी झाल्याशिवाय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, याबाबत केंद्र सरकारने निश्चित धोरण राबवले पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

 

News English Summary: Corona petitions have been filed in various high courts across the country. The petition filed on the issue of migrant workers was heard in the Supreme Court. “Your efforts are insufficient and we are not satisfied with it,” the court told the Center.

News English Title: Corona lockdown Supreme court slams Centre govt over migrant laboures issue news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x