15 May 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

गौप्यस्फोट | मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचा संस्थापक अनुप मरार भाजपचा सदस्य

Maratha reservation

मुंबई, २८ मे | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापवण्यासाठी भाजपचे नेते पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे कोरोना आपत्तीत राज्य सरकारच्या अडचणी वाढविण्यासाठी मराठा समाजाला भडकावून भाजप नेते मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. केंद्रा सर्व विषय शक्य असताना देखील राज्यातील भाजप नेते मूळ मुद्द्याला बगल देत केवळ समाज कसा पेटेल याची काळजी घेताना दिसत आहेत. यात समाजाच्या संविधानिक आणि न्यायिक मार्गाने आरक्षण देण्याच्या विषयाला पूर्णपणे दुर्लक्षित करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा हेतू असल्याचं म्हटलं जातंय.

आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात असून, राज्यातील सत्ताधारी पक्ष हे केंद्राच्या अधिकारात असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनच मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. यावरून सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील सवाल केला आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भारतीय जनता पक्षाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला आहे. सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली आहेत. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा संतप्त सवाल सावंत यांनी केला आहे.

 

News English Summary: Congress chief spokesperson Sachin Sawant has revealed that Save Merit Save Nation is affiliated with the Bharatiya Janata Party and the Sangh. Dr. Sachin Sawant, the original founder of Save Merit Save Nation. Documents have tweeted that Anup Marar is a BJP office bearer.

News English Title: Maratha Reservation Save Merit Save Nation BJP Maharashtra politics exposed by Sachin Sawant news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x