17 May 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Health First | गुळवेल खाण्याचे फायदे | आयुर्वेदात खुप मोलाचे स्थान

Ayurvedic Giloy Gulvel

मुंबई, २८ मे | गुळवेलला भारतीय आयुर्वेदात खुप मोलाचे स्थान आहे. आयुर्वेदात गुळवेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याला गिलोय (टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया), गुडूची आणि अमृतवेल असेही म्हणतात. आपल्या देशात गुळवेलचा उपयोग बर्‍याच आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. जेव्हा पासून जगभरात कोविडचा पादुर्भाव झाला आहे, तेव्हा पासून गुळवेलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इम्युनो-मॉड्युलेटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेल कडे बघितले जाते.

त्याचबरोबर ताप, मधुमेह, मूत्रमार्गाच्या विकार, अशक्तपणा, कावीळ, दमा, ह्रदयाचा विकार इत्यादींच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापरला जातो. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने गुळवेल खाण्याचे फायदे खूप आहेत.

गुळवेल कशी ओळखणार ?
गुळवेल कसा ओळखावा ? हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. गुळवेलचे झाड हे वेलीसारखी असते, त्याची पाने सुपारीच्या पानांसारखे असतात. गुळवेलचे खोड दिसायला हिरवे असते. परंतु, तपकिरी रंगाची पातळ साल असते आणि त्याचा अंतर्गत भाग गोलाकार चक्रीदार असतो. जस जसे देठाचे वय वाढते, तस तसे आकाराने मोठे होत जाते.

मधुमेह विरोधी:
गुलवेल झाडाचे खोड मधुमेह मध्ये वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो, गुळवेल ऑक्सिडीटीव्ही ताण कमी करून शरीरातील इन्सुलिन वाढवते व शरीरात बनणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी करते.

विषाक्त-विरोधी प्रभाव:
गुळवेल शरीरातील थिओबार्बीचुरिक ऍसिड रिएक्टिव पदार्थाची (टीबीएआरएस) पातळी कमी करून संरक्षणात्मक परिणाम दाखवते.

संधिवात आणि अस्थीरोगात गुणकारी:
गुळवेल व आलं संधीवतामध्ये अत्यंत गुणकारी आहे व वर्षानुवर्षे गुळवेलला संधीवतामध्ये वापरले जात आहे.
गुळवेल हाडांमध्ये ऑस्टिओब्लास्ट वाढवते ज्यामुळे बोन मॅट्रिक्समध्ये जास्तीत जास्त खनिज जमा होऊन अस्थीरोगात ढिसुळ झालेली हाडे भरीव होतात.

कर्करोगविरोधी प्रभाव:
गुळवेल कर्करोगाविरोधी असलेला प्रभावावर जगभर रीसर्च चालू आहे व बऱ्याच संशोधकांनी गुळवेल चा कर्करोग विरोधी प्रभाव मान्य सुद्धा केला आहे.
गुळवेल शरीरातील टीशूंचे वजन वाढवते तसेच कर्करोगामुळे नष्ट व परिणाम झालेल्या शरीरातील टिशुंचे पुनर्निर्माण करते.

जंतुनाशक (अँटी मायक्रोबियल):
गुळवेल अनेक किटाणू विरोधात गुणकारी आहे, अनेक हानिकारक किटाणू श्वसन मार्गातून शरीरात जातात व भयानक रोग उत्पादन करतात,गुळवेल श्वसण मार्गात होणाऱ्या सर्व आजारांवर अतिशय परिणामकारी आहे.

अँटी ऑक्सिडन्ट:
शरीरातील पेशी आपल्याला ह्रदयविकार, कर्करोग व इत्यादी प्राणघातक रोगांमध्ये सुरक्षा देण्याचे काम करतात,
गुळवेल अँटी ऑक्सिडन्ट असल्याकारणाने ते शरिरातील पेशींची हानीकारक रॅडिकल्स पासून सुरक्षा करते.

त्वचारोगांवर रामबाण:
गुळवेलमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचा उजलायला व त्वचेवरचे काळे डाग, पिंपल्स, मुरूम, वयामुळे पडलेल्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करून आपल्या तरुन वयात असलेली ताजी तवान त्वचा परत देते.

गुळवेलचे केसांवरील लाभदायक परिणाम:
गुळवेल मध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म असतो जो केसांच्या टिशुंचे संरक्षण करून केस मजबूत होण्यासाठी मदत करतो तसेच गुळवेल काढ्याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होते व केस गलायची कमी होतात

गुळवेलचे आर्युवेदामध्ये सांगितलेले उपयोग:
आयुर्वेदा मध्ये गुलवेल चा उपयोग ताप,कावीळ,जुलाब,अतिसार,कर्करोग, जंतुनाशक, हाडांचे फ्रॅक्चर, अस्थीरोग, संधिवात, दमा, त्वचेचे रोग, दमा, सर्पदंश इत्यादी रोगांमध्ये केला जातो.

 

News English Summary: Gulvel has a very important place in Indian Ayurveda. Gulvel is widely used in Ayurveda. It is also known as Giloy (Tinospora cordifolia), Guduchi and Amrutvel. In our country, Gulvel is used for many Ayurvedic medicines. Ever since Covid became popular around the world, Gulwel has gained more importance. Gulvel is considered as a well-known immuno-modulator herb used to improve immunity.

News English Title: Ayurvedic Giloy Gulvel health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x