17 May 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Health First | मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या फायदे

fish health benefits

मुंबई, २८ मे |  भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत. मात्र मोठ्या संख्येने मांसाहारी नागरिक देखील असून चिकन, मटण आणि मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या सर्व पदार्थांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये मासा खूपच पौष्टिक असून यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळतात.

मासे खायला अनेकांना आवडतात. काहींच्या आहारात माशांचा समावेश असतो. विशेषत: कोकणपट्ट्याकडे राहणारे लोक समुद्रातील मासे अगदी आवर्जून खातात. जसं कोळंबीची रेसिपी, फ्राय पापलेट इ. आहारात माशांचा समावेश असणे फारच फायद्याचे असते. उत्तम त्वचा, केस आणि आरोग्यासाठी मासे वरदान असून तुम्ही मासे खात नसाल तर तुमच्या आहारात तुम्ही त्याचा समावेश करायला हवा. आज जाणून घेऊया मासे खाण्याचे फायदे. यासोबतच आपण जाणून घेणार आहोत माशांचे प्रकार. आता माशांचे प्रकार आणि त्यांचे फायदे वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात माशांचा समावेश कराल. आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असणाऱ्या माशांचे इतर देखील फायदे आहेत. त्यामुळे आज आपण या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

फॅटच्या दृष्टीने महत्त्वाचे:
आपलं दररोजचं जेवण हे संतुलित असतंच असं नाही.माशांमधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात फॅट्स मिळतात. मात्र हे फॅट्स घातक नसून आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात फॅट्स मिळतात.

नैराश्यावर उपाय:
आजच्या या धावपळीच्या जीवनात नैराश्य हा खूप मोठा आजार झाला आहे. अनेकजण नैराश्येत येऊन चुकीचे पाऊल उचलत असतात. मात्र नियमित मासे खाणाऱ्या मंडळींना नैराश्य येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड असतं त्याचाही उपयोग होतो.

गंभीर आजारांपासून संरक्षण:
नियमित मासे खाल्ल्यास तुमचं शरीर संतुलित राहतं. त्यामुळे डायबेटीस आणि रक्तदाबासारख्या आजारांपासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीराच्या विविध अवयवांवरदेखील माशांच्या सेवनाचा उत्तम प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन दिवस मासे खाल्ल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

हृदयासाठी फायदेशीर:
हल्ली अनेकांना हृदययविकारचा आजार असतो. त्यामुळे झटका येऊन मृत्यु होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र मासे हे आरोग्याच्या दृष्टीने आणि खासकरून हृदयासाठी अतिशय हेल्दी असल्याचं समोर आलं आहे. नियमित मासे खाणाऱ्यांना हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी असल्याचं देखील सिद्ध झालं आहे.

व्हिटॅमिन डी चा खजाना:
मासे हे व्हिटॅमिन डी चा खजिना आहेत. विविध जातींच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आढळून येतं. व्हिटॅमिन डी तसंच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे लहान मुलांमधील टाईप वन डायबेटीससारख्या आजारांवर फायदेशीर असतं आणि माशांमध्ये ते मिळतं. त्यामुळे दररोज मासे खाल्ल्यास तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमी जाणवणार नाही.

 

News English Summary: India is an agricultural country. India has a large number of vegetarians. However, there are also a large number of non-vegetarians who eat large quantities of chicken, meat and fish. The nutrients in all these foods are very useful for the body. The fish is very nutritious and gives you a lot of vitamins and proteins.

News English Title: Eating fish health benefits health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x