30 April 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

२०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत का? | ५३ टक्के लोकं म्हणाले 'नाही' - सर्व्हे

2024 Loksabha Election

मुंबई, ३१ मे | मागील सात वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लोकमत समुहाने वाचकांचा ऑनलाईन सर्व्हे घेतला. या सर्व्हेनुसार मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते;

  1. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल किती स्टार द्याल?
  2. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपाला किती जागा मिळतील?
  3. २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत असं वाटतं का?
  4. मोदी सरकार कोरोनाचं संकट योग्यरित्या हाताळत आहे का?
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नाही?

या मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

तसेच येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर अत्यंत चुरस पाहायला मिळाली. जवळपास २७.९५ टक्के लोकांनी ०-१०० यामध्ये जागा मिळतील असा दावा केला तर २७.१९ टक्के लोकांनी ३०१-४०० पर्यंत जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. तर २५.९१ टक्के लोकांनी भाजपाला १०१-२०० या दरम्यान जागा मिळतील असं म्हटलं आहे. त्याचसोबत १८.९५ टक्के लोकांनी २०१-३०० यामध्ये भाजपाला जागा मिळतील असं सांगितले आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असं वाटतं का? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर ५२.५९ टक्के लोकांनी नकार दिला आहे आणि ४३.६१ टक्के लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे तर ३.८१ टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार का? हे येणारा काळच सांगू शकेल.

 

News English Summary: The Lokmat Group conducted an online survey of readers on the performance of the Modi government in the last seven years. According to the survey, some questions were asked about the performance of the Modi government so far.

News English Title: Maximum peoples do not want Narendra Modi as Prime minister again in 2024 Loksabha Election news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x