2 May 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

महाराष्ट्र असो किंवा प. बंगाल | वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरून केंद्रीयं अडथळ्यांचे राजकारण सुरूच

West Bengal assembly election 2021

कोलकत्ता, ३१ मे | वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य आणि पक्षीय राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्याचं मोदींच गुजरातमधील तंत्र देश पातळीवर देखील राबवलं गेल्याचे अनेक दाखले आहेत. अगदी उत्तर प्रदेशात देखील त्यांनी माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पदी बसवून तिथलं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवण्याची योजना आखल्याचं वृत्त आहे. तर महाराष्ट्रात देखील राज्यातील नेमके जे वरिष्ठ IPS अधिकारी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर गेले त्यांनीच राज्य सरकारला अडचणीत आणल्याचं राजकारण देखील ताजे आहे. आता सध्या पश्चिम बंगालमध्ये देखील भविष्यात तेच अस्त्र उपसलं जाऊ शकतं असे संकेत मिळत आहेत.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये वाद पेटला आहे. केंद्राने बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांना सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्लीत हजर राहण्यास सांगितले होते. पण, अलापन अद्याप दिल्लीत दाखल झाल्याची कुठलीही माहिती मिळालेली नाही. यामुळे केंद्र सरकार अलापन यांच्यावर कारवाई करू शकते. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पाच पानांचे पत्र लिहून अलापन यांना रिलीव्ह करणार नसल्याचे म्हटले आहे.

अलापन यांच्या बदलीविरोधात ममता यांनी मोदींना पत्र लिहून मुख्य सचिवांना रिलीव्ह करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ममतांनी बदलीच्या आदेशाला एकेरी म्हटले. ममता आपल्या पत्रात म्हणाल्या की, सध्या कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अशा नाजुक परिस्थितीत आम्ही आमच्या मुख्य सचिवांना रिलीव्ह करणार नाहीत. आम्ही आमचा परस्पर समन्वय, लागू केलेले कायदे आणि योग्य सल्लामसलत यांच्या आधारे त्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

आपल्या पत्रात त्यांनी केंद्र सरकारच्या आदेशास पूर्णपणे घटनाबाह्य, कायदेशीरदृष्ट्या अस्थिर म्हटले. तसेच, कलाईकुंडाचा उल्लेख करत, या बदलीमागे कलाईकुंडामधील बैठकीचा संबंध आहे का ? असा प्रश्नही विचारला.

याच चक्रीवादळामुळे आलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगालमध्ये दाखल झालेह होते. यावेळी बोलवण्यात आलेल्या बैठकीत अलापन उशीरा दाखल झाले. या बैठकीच्या काही तासातच त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली. दरम्यान, निवृत्त अधिकारी आणि कायद्याचे जानकार सांगतात की, मोदी सरकारने भलेही मुख्य सचिवांची दिल्लीत बदली केली असेल. पण, हा आदेश लागू करणे अवघड आहे. त्यांना रिलीव्ह करणे राज्याच्या अधिकारात आहे. त्यामुळे ममता त्यांना दिल्लीत पाठवण्यास नकार देत आहेत.

 

News English Summary: The transfer of West Bengal Chief Secretary Alapan Bandhopadhyay has sparked controversy between Chief Minister Mamata Banerjee and the Center. The Center had asked Bengal Chief Secretary Alapan Bandhopadhyay to be present in Delhi by 10 am on Monday. However, no information has been received that Alapan has yet arrived in Delhi.

News English Title: Disciplinary proceedings by dopt against West Bengal chief secretary if he does not join on central deputation central govt Narendra Modi vs Mamata Banerjee news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x