30 April 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

हॅकर'च थेट पंतप्रधानांना आधार चॅलेंज, तुम्ही तुमचा आधार नंबर सार्वजनिक करू शकता?

नवी दिल्ली : फ्रेंच हॅकर इलियट अल्डरसन यांने काल भारताच्या आधार कार्ड’च्या सुरक्षेचे अक्षरशः धिंडवडे काढले आणि थेट ट्राय’च्या अध्यक्षांची आधार कार्ड’ला लिंक असणारी सर्व गोपनीय माहिती उघड केली होती आणि एकच खळबळ माजली होती. परंतु हा फ्रेंच हॅकर अल्डरसन इथेच थांबलेला नाही.

इलियट अल्डरसन’ने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करत,’तुम्ही तुमचा आधार नंबर सार्वजनिक करू शकता? जर असेल तर?’ असा प्रश्न केल्याने त्याचा भारतीय ऑनलाईन व्यवस्थेवरील ढिसाळ सुरक्षेवर किती विश्वास आहे याचा प्रत्यय आला आहे. कालच त्याने ट्राय’चे अध्यक्ष आर एस शर्मा यांची गोपनीय माहिती उघड केली होती आणि ती समाज माध्यमांवर सार्वजनिक केली होती. त्यानंतर युआयडीएआयने ट्रायच्या अध्यक्षांचा डेटा हॅक झालाच नसून हॅकरने त्यांची पहिल्यापासूनच सार्वजनिक असलेली माहिती दाखवत आधारचा डेटा हॅक झाल्याची सारवासारव केली होती.

परंतु वेळोवेळी इतरांना चॅलेंज देणारे मोदी आता इलियट अल्डरसन’चे हे आवाहन स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारामुळे भारतीय सायबर विश्वात सुरक्षेप्रती असलेली अनास्था समोर येत आहे असं तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे यापुढे युआयडीएआय आधार सुरक्षेबाबत काय उपाय योजना करणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x