22 May 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

सध्या कोणतीही चर्चा नाही, पण भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले

Prakash Ambedkar

अकोला, ११ जून | महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं आहे. ते आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्द्यावर संकेत दिलेत. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अकोल्यातही नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार यांनी 2024 मध्ये ‘महाविकास आघाडी’ एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही नाना पटोले यांनी शरद पवारांचा ‘एकी’चा दावा खोडून काढला. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.

 

News Summary: Prakash Ambedkar had done a great disservice to the Congress front by getting over 42 lakh votes in the Lok Sabha and 27 lakh in the Assembly. Against this backdrop, the Congress today signaled its alignment with Ambedkar in the future. Congress state president Nana Patole has made a big statement that he will discuss with Prakash Ambedkar from the point of view of alliance. He was speaking at a press conference in Akola today.

News English: In future we could talked with Prakash Ambedkar over alliance said Nana Patole during Akola tour news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x