26 April 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

उत्तर प्रदेश | निवडणुकीत योगी नव्हे तर अखिलेश यांची हवा | बसपाचे ९ आमदार भेटीला

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, १५ जून | युपीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच यूपीतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बहुजन समाज पार्टीचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.

बहुजन समाज पार्टीच्या बंडखोर आमदारांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानं हे आमदार भविष्यात समाजवादी पक्षाची वाट धरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतील. मंगळवारी अखिलेश यादव यांची भेट घेणाऱ्यांमध्ये असलम राइनी, असलम अली चौधरी, मुज्तबा सिद्दीकी, हाकीम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय, अनिल सिंह या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे १९ आमदार विजयी झाले होते. मात्र नंतर आंबेडकरनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपली ही जागा गमावली होती. यानंतर रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत, पक्षातून काढून टाकले होते. गेल्या वर्षी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या सात आमदारांनी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारास समर्थन देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BSP 9 MLAs meet Akhilesh Yadav in office news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x