8 May 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांना मिळणार २ लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज

Through Maulana Azad Minority Economic Development Corporation

मुंबई, २३ जून | केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी व महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते, यासाठी अनेक योजना ही राबवत असते, महिला सक्षमीकरण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याकरता पहिल्या टप्प्यात 750 बचत गटांना कर्ज देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. चला तर जाणून घेऊ या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

योजनेविषयी संपूर्ण माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. किंवा या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, आपणमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, माविम, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या संस्थांचे मुख्यालय किंवा जिल्हा, तालुका कार्यालयाशी चौकशी करू शकता.

या योजनेस सहभागी होण्याकरिता अर्जाची अंतिम तारीख २० जुलै इतकी आहे. तरी महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.

योग्यता / पात्रता:
बचत गटातील ७०% सभासद अल्पसंख्यांक समाजातील असावेत.
बचतगटातील सर्व सभासद महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
बचतगटातील अध्यक्ष व सचिव साक्षर असावेत.
वय-बचतगटातील सर्व सभासदांचे वय १८ वर्ष पेक्षा जास्त असावे.

बचतगटातील प्रतेक सभासदाचे वार्षिक उतपन्न:
शहरी भागासाठी – रु 1,03,000/- पेक्षा कमी
ग्रामीण भागासाठी – रु 81,000/- पेजा कमी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Through Maulana Azad Minority Economic Development Corporation Women’s self help groups Loan up to Rupees 2 lakhs news updates

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x