18 May 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

पोळ्या (चपात्या) फुलत नाही? | मग पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा - नक्की वाचा

Special Recipe

मुंबई, २६ जून | पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जणांना गोलाकार आणि मऊ पोळ्या बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी पोळ्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (chapati) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. तसेच ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली. पिठात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोळी लाटताना ती चिकटेल आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पोळी भाजताना ती कडक होईल आणि नंतर चिवट होईल. त्यामुळे नक्की काय टिप्स आपण मऊ, गोलाकार आणि फुलणाऱ्या पोळीसाठी वापरायच्या हे या लेखातून पाहूया.

अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. आज आपण नरम आणि फुलणारी चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया…

* पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.

* पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.

* जरी आपण अनेक गोष्टी मोजून मापून करतो, तरी पीठ मळताना आपण मोजून पाणी घेत नाही, तर अंदाजे घेतो. बऱ्याचवेळा असे केल्याने पीठ एकतर कडक होते किंवा खूप मऊ होते. त्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यासाठी मोजून पाणी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ कप पीठासाठी २ कप पाणी घ्या.

* नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी टाका.

* पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा. कारण मीठ देखील पाणी सोडते. यामुळे पीठाला कणिक ओलं होण्याची शक्यता असते.

* एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून ५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा कणिकाला चांगले मळा.

* त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा, या वेळी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल.

* त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल.

* कधीही अति आच अथवा मंद आचेवर पोळी शेकू नका. पोळी भाजण्यासाठी तव्याखालील गॅस हा कायम मध्यम आचेवर ठेवा

* पोळी तव्यावर टाकल्यावर पहिली बाजू ही साधारण 30 सेकंदात परता जर तुम्हाला पोळी मऊ हवी असेल

* पोळीवर जास्त पीठ लागले असेल तर ते कापडाने पुसून घ्या. पीठ तसेच ठेऊ नका. पोळी दिसायला अतिशय घाण दिसेल पीठ तसेच ठेवल्यास, त्यामुळे भाजताना याकडे विशेष लक्ष द्या

* तुम्हाला पोळी अगदीच मऊ हवी असेल तर तुम्ही कणीक भिजवताना त्यात दूध अथवा थोडंसं दही घालू शकता (तुम्हाला आवडत असल्यास)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: How to make soft roti Chapati perfect dough making tricks news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x