29 April 2024 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

MLA Shyamsundar Shinde

नांदेड, २८ जून | सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार असल्याचं दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची काम करण्याची पध्दत आपल्याला आवडते. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपल्याला मदत देखील करतील म्हणूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे. आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे चहापानासाठी आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. ते जरी शेतकरी कामगार पक्षातून निवडून आले असले तरीही त्यांनी आपला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला जाहीर केला होता. परंतु, फडणवीसांचं 72 तासांचं सरकार जाताच श्यामसुंदर शिंदे यांनी दुसरा निर्णय घेत महाविकास आघाडीला आपला पाठिंबा असल्याचं तेव्हा म्हटलं होतं.

दरम्यान, असं असलं तरी ते शेकापमध्येच होते. मात्र, आता शेकापला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या सत्तेत असणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या मतदारासंघाची विकासकामं वेगाने व्हावीत यासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Loha Kandhar Shekap MLA Shyamsundar Shinde will join NCP news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x