27 April 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपचं 'जनाब' राजकारण फसलं | उत्तर प्रदेश धर्मांतर रॅकेट | अटक झालेल्या आरोपीचं मोदींनी कौतुक केलेलं

Uttar Pradesh conversion racket

मुंबई, ३० जून | उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर रॅकेटप्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) गावचा तरुण इरफान खान ख्वाजा खान पठाण याला सोमवारी उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्लीत अटक केली. इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ज्ञ म्हणून काम करतो.

उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर खळबळ उडाली. त्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. याच विषयावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक ‘जनाब’ संबोधत प्रश्न उपस्थित केले होते.

मात्र आता धक्कादायक गोष्ट म्हणजे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे सांकेतिक भाषेत उत्तम रूपांतर केल्याबद्दल इरफानला शाबासकी देऊन मोदींनी त्याचे कौतुक केले होते. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, इरफानच्या अटकेेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून त्याला या प्रकरणात विनाकारण गोवले असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर, बनारस आणि नोएडा भागातील मूकबधिर मुले, तरुणी, महिलांना फूस लावून त्यांचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली २२ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) मुफ्ती जहाँगीर आलम कासमी आणि मोहंमद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी दिल्लीत अब्दुल मन्नान ऊर्फ मन्नू राजीव यादव, (रा.गुरुग्राम, हरियाणा), इरफान ख्वाजा पठाण (सिरसाळा, ता.परळी, जि.बीड)आणि राहुल प्रवीण भोला ( रा.उत्तमनगर, नवी दिल्ली ) या तीन जणांना अटक केली. धर्मांतर रॅकेटची देशभरात चर्चा सुरू असतानाच सोमवारी इरफान पठाणला अटक केल्यामुळे खळबळ उडाली.

इरफान हा चार वर्षांपासून दिल्ली येथील केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाशी संबंधित विभागात मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेचा तज्ज्ञ म्हणून काम करतो. धर्मांतर प्रकरणात इरफानला अटक झाल्यामुळे सिरसाळा गावातील त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. सिरसाळा गावातील जायकवाडी वसाहतीत त्याचे घर आहे. खान कुटुंबात मोठा भाऊ फुरखान, दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ इम्रान व सर्वात छोटा भाऊ इरफान पठाण आहे. इरफानचे वडील ख्वाजा खान पठाण हे एसटी महामंडळात मेकॅनिक होते.

काय आहे नेमके प्रकरण:
गेल्या आठवड्यात २२ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) दिल्लीच्या जामियानगर भागातून मुफ्ती जहाँगीर आलम कासमी आणि मोहंमद उमर गौतम या दोन जणांना अटक केली होती. इस्लामिक दवा सेंटरच्या नावाखाली गरीब, मूकबधिर, मुले,तरुणांना पैसे, नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून कासमी आणि उमर गौतम हे धर्मांतर करायचे. आतापर्यंत त्यांनी जवळपास १ हजार लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली उमर गौतम याने दिली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.

आयएसआयकडून पैसा, ईडीने सुरू केला तपास:
मूकबधिर विद्यार्थी, गरीब महिला आणि नागरिकांचे बेकायदा धर्मांतर करण्याच्या या रॅकेटमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचाही हात असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने प्राथमिक अहवाल नोंदवून तपास बेकायदा व्यवहार कायद्यानुसार कायद्यानुसार तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या काही मालमत्ताही जप्त करण्याचे अधिकार ईडीला आहेत.

आतापर्यंत १००० लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली
हे रॅकेट चालवणारे दोन जण असून त्यापैकी उमर गौतम याने आतापर्यंत १ हजार लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली उत्तर प्रदेश पोलिसांना दिली आहे. पैसे, नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून नोएडा, कानपूर, वाराणसी येथील गरीब तसेच मूकबधिर मुले, महिलांचे बेकायदा धर्मांतर करण्यात आले, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले.

मूकबधिर मुलांचे धर्मांतर केल्याचा ठपका : इरफान हा सांकेतिक भाषेत पारंगत आहे. दुभाषा म्हणून काम करता-करता इरफान याने मूकबधिर मुलांना आमिष दाखवून त्यांचे बेकायदा धर्मांतर केल्याचा ठपका उत्तर प्रदेश पोलिसांनी ठेवला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh conversion racket case Irfan Pathan arrested resident of Sirsala village in Beed district news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x