13 May 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

१२ आमदारांच्या पत्रांचा राज्यपालांना विसर | राजभवन हे भाजपचं कार्यालय झालंय - नाना पटोले

Bhagat Singh Koshyari

मुंबई, ३० जून | पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तर, राज्यपालांना 12 नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पाच आणि सहा जुलै, या दोन दिवशी राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरले जावे, अशी सूचना करणारे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. मात्र, राज्य सरकारकडून 12 नामनिर्देश सदस्यांबाबत पत्रावर अद्यापही काही निर्णय घेत नाहीत. राजभवन हे भारतीय जनता पक्षाचे कार्यालय झाले असल्यासारखे राज्यपाल वागत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी राज्यपालांना लगावला. राज्यपाल हे सैविधानिक पद आहे. या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी पदाची गरिमा ठेवणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला. पण, काँग्रेस पक्षाकडून नेहमीच राज्यपालपदाच्या गरिमेबाबत आदर ठेवण्यात येतो, असेही नाना पटोले म्हणाले आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र:
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत पत्राद्वारे आठवण करून दिली आहे. तसेच, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती द्या, अशा सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress state president Nana Patole ask governor Bhagat Singh Koshyari about letter regarding 12 nominated MLAs news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x