12 May 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ
x

पडळकर ही एक प्रवृत्ती आहे | भाजपमधील २-४ जणांचं मानसिक संतुलन ढासळलं - आ. अमोल मिटकरी

NCP MLA Amol Mitkari

मुंबई, ३० जून | भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. पवारांच्या दिल्ली बैठकांवरून त्यांनी पवारांवर जहरी टीका काली आहे. पवार हे मागील ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. परंतु, ‘रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी तिसऱ्या आघाडीवरुन पवारांवर, अशा शब्दात टीका केली आहे.

दरम्यान, पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं’, असा टोला मिटकरी यांनी लगावलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Amol Mitkari reply to BJP leader Gopichand Padalkar’s criticism on Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#AmolMitkari(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x