27 April 2024 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली | फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis

मुंबई, ०५ जुलै | विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. परंतु, पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरा-समोर आले. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. विरोधक आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या गैरवर्तनानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे खोटी स्टोरी रचून भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू:
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले आहे. या मुद्द्यावरुन सरकार अपयशी ठरले असल्याचे आम्ही सरकारला दाखवले यामुळेच त्यांनी खोटी स्टोरी रचून खोटे आरोप लावून 12 आमदरांना निलंबित केले आहे. तसेच ओबीसींसाठी 12च आमदार काय आम्ही 106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणार:
जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुन्हा दिले जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा संघर्ष सुरूच राहणार नाही. एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचे या ठिकाणी सदस्यपद रद्द झाले तरीही आम्हाला काळजी नाही. आज सभागृहात जे पाहिलं, अनेक वेळा लोक यापूर्वी मंचावर चढले आहे. परंतु कधीही कुणाला निलंबित करण्यात आलेले नाही. नेहमीच अध्यक्षांच्या दालनात बाचाबाची होते. परंतु, कधीही कुणी निलंबित केले जात नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करुन हे निलंबन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकाही सदस्याने शिवी दिलेली नाही आणि शिवी कोणी दिली हे देखील सर्वांनी पाहिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mahavikas Aghadi government fabricated a false story to suspend BJP MLAs said opposition leader Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x