4 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार?
x

सोशल मिडीयावर बदनामी, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ पेजवर गुन्हा दाखल होणार?

पुणे : एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या फेसबुक पेजवरून बदनामी केल्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

फेसबुकवर ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजच्या माध्यमातून एनसीपीच्या नेत्यांची खूप आक्षेपार्ह शब्दात बदनामी केली जात असल्याची लेखी तक्रार आणि आक्षेपार्ह फोटोसकट लेखी तक्रार करण्यात आली असून या तक्रारीत मजकुरात बदल करणे तसेच मूळ फोटोमध्ये मॉर्फिंग करण्याचे प्रकार सुरु आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्या पेजचे अॅडमिन यांच्यावर ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्रारीत खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन ही लेखी तक्रार करण्यात आली आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास आमची काहीच हरकत नाही, परंतु वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आमच्या पक्षाच्या नेत्यांनी अथवा स्वतः मी कधीही कुठेही न केलेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील लोकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x