3 May 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

Tokyo Olympics 2020 | वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले पहिले पदक | रौप्यपदक जिंकले

Tokyo Olympics 2020

टोकियो, २४ जुलै | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

दुसरीकडे भारतीय नेमबाज सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सहाव्या मालिकेच्या पात्रता फेरीत सौरभने 600 पैकी 586 गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले. या इव्हेंटमध्ये आणखी एक भारतीय नेमबाज अभिषेक पात्रता फेरीतच बाद झाला. 575 गुणांसह तो 17 व्या स्थानावर राहिला. पात्रता फेरीमध्ये टॉप-8 क्रमांकाच्या नेमबाजला अंतिम सामन्यात स्थान मिळते.

पुरुषांच्या हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडला 3-2 ने हरवून दमदार सुरुवात केली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांची जोडी तिरंदाजी मिक्स्ड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. त्याच वेळी नेमबाजीच्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताची एलाव्हनिल वॅलारीवान आणि अपूर्वी चंदेला अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. ज्युडोमध्ये भारताच्या सुशीला देवीला पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Olympics 2020 Weightlifter Mirabai Chanu Wins India’s 1st Medal news updates.

हॅशटॅग्स

Tokyo Olympics 2020(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x