18 May 2024 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
x

Special Recipe | तिखट बांगडा फिश करी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Bangda fish curry recipe

मुंबई, ०१ ऑगस्ट | बांगडा फिश करी हे कोकणी माणसाचं आवडतं खाद्य देशभर परिचित आहे. बांगडा फिश करी हा पदार्थ आज नॉनव्हेज हॉटेलमधील आवडीचा पदार्थ आहे. कोकणी खाद्य पदार्थ आज राज्य आणि देशपातळीवर अत्यंत आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे आज आपण घरच्या घरी बांगडा फिश करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी;

संपूर्ण साहित्य:
* 2-3 स्वच्छ केलेले बांगडे
* वाटणासाठी
* 3 मध्यम कांदे उभे चिरून
* 1 कप ओले खोबरे
* 5- 6 लसूण पाकळ्या
* आलं
* कोथिंबीर
* 1 टोमॅटो
* लाल तिखट आवडीनुसार
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1/2 टीस्पून हळद
* मीठ चवीनुसार
* तेल
* कडिपत्ता
* कैरीच्या फोडी
* कोकम किंवा आगळ

संपूर्ण कृती:
१. पॅनमधे कांदा,ओले खोबरे,आलं, लसूण थोडं तेल घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
२. ब्लेंडरमधे हे मिश्रण, टोमॅटो, कोथिंबीर थोडं पाणी घालून वाटण वाटून ‌घ्या.
३. कढईत तेल गरम करून कडिपत्ता,तयार वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
४. नंतर त्यात वरील सर्व मसाले,मीठ घालून मिक्स करा‌. २ ग्लास पाणी घालून त्यात बांगडे,कैरीचे काप,कोकम आगळं घालून मिक्स करा. २० मि. छान शिजू द्यावे
५. भात,भाकरीसोबत हे करी फार छान लागते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Bangda fish curry recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x