27 April 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं

Sanjay Rathod

पुणे, ०२ ऑगस्ट | पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी मारली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.

पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं या वृतांत म्हटलं गेलंय. पूजाने सर्व कॉलचे रिकॉर्डिंग केली आहे. संभाषण बंजारा भाषेमध्ये झाले होते. पोलीस या संभाषणाचे ट्रान्सलेशन करुन घेत आहेत. संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, त्याच समाजातून पूजा चव्हाण येते’, पोलिसातील सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील माहिती दिली.

पूजा बीडची असून ती पुण्यामध्ये एक कोर्स करत होती. तिचे आणि आमदार राठोड यांचे प्रेमसंबंध होते असा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉल रिकॉर्डिंग असलेला पूजा चव्हाणचा फोन पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये Science Laboratory (FSL) पाठवण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Probe finds calls between Shivsena leader Sanjay Rathod And Pooja Chavan in suicide case news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x