27 April 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं | काँग्रेसमध्ये मोठ्या जवाबदारीचे संकेत

Prashant Kishor

नवी दिल्ली, ०५ ऑगस्ट | प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.

आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.

अनेक राज्यांच्या विधानसभेत मोदी-शहांना शह:
प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदी शहांना धूळ चारली आहे. मोदी-शहांनी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण, मीडिया मॅनेजमेंट आणि संबंधित राज्यातील निवडणुकीत मोठी निवडणूक पूर्व योजना आखूनही ते प्रशांत किशोर यांच्या प्रत्यक्ष जमिनीवरील रणनीतीमुळे पराभूत झाले होते. अगदी नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये त्याचे परिमाण समोर आहेत. तत्पूर्वी, पंजाब, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील तेच पाहायला मिळालं होतं. अगदी मोदी ब्रँड देशभरात मोठं करण्यातही त्यांची स्वतःची मोठी भूमिका आहे. त्यामुळे २०२४ मध्ये देखील ते मोठा राजकीय भूकंप करतील जर काँग्रेसने त्यांना थेट सोनिया गांधींचे सल्लागार नेमल्यास असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Political strategist Prashant Kishor resigns as advisor to Punjab CM Amarinder Singh news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x