21 September 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

तालिबान दहशतवादी संघटनेजवळ एवढा पैसा येतो कोठून? | असा उभा केला जातो पैसा

Taliban in Afghanistan

काबुल, १८ ऑगस्ट | तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरही कब्जा केला. अफगाणिस्तानमध्ये अराजकाता निर्माण झाली असून तालिबानी सरकार आले आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहेजो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतात तालिबान्यांनी 20 दिवसात संपूर्ण देशावर ताबा मिळवला. अमेरिकेवर मात करणाऱ्या तालिबान्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे? याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. जाणून घेऊया तालिबान्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत.

तालिबान्यांचा मोठा स्त्रोत अफू:
अफगाणिस्तानात गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे जगातील अफूच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन होते. विशेष मालिकांच्या संपूर्ण उत्पादनावर तालिबान्यांचा ताबा आहे. अफूच्या विक्री व तस्करीतून तालिबान्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. व हा त्यांचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. UNODC च्या मते, गेल्या चार वर्षात अफगाणिस्तानमध्ये अफूचे सर्वात जास्त उत्पन्न घेतले गेले आहे. कोरोना काळातही अफगाणिस्तानमध्ये अफूच्या उत्पादनात 37 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

2017 मध्ये 9900 टन अफूचे उत्पादन:
UNODC च्या मते, अफगाणिस्तानात 2017 मध्ये अफूचे 9900 टन उत्पादन झाले. शेतकऱ्यांना यामाध्यमातून सुमारे 10 हजार कोटी रुपये कमावले असून हे देशाच्या GDP च्या 7% होते. अहवालानुसार, बेकायदेशीर अफूची अर्थव्यवस्था सुमारे 49,000 कोटी रुपये होती. यामध्ये स्थानिक वापर, औषधांसाठी निर्यात आणि इतरांचा समावेश आहे.

तालिबानची वार्षिक उलाढाल सुमारे 3 हजार कोटी रुपये:
अफूच्या माध्यमातून तालिबानला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु, तालिबान या व्यवहाराचा कोणताही तपशील प्रसिद्ध करत नाही. यामुळे त्यांचे एकूण मालमत्ता किती आहे हे सांगणे कठीण आहे. फोर्ब्सने 2016 मध्ये तालिबानची वार्षिक उलाढाल 2,968 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Funding source of Taliban in Afghanistan news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x