28 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

Health First | तोंड कडू होण्याची 'ही' आहेत कारणं - नक्की वाचा

Bitter taste in mouth causes and remedies

मुंबई, ०५ सप्टेंबर | अनेकदा आपण कडू पदार्थ खाल्ले नाहीत तरी तोंडाला कडवटपणा येतो. यामागे अनेक कारणं आहेत. तुम्ही कारलं खाल्लं नाही, औषधांच्या गोळ्या घेतल्या नाहीत किंवा एखादा कडू पदार्थ खाल्ला नाही तरी तुमच्या जिभेला सर्वकाही कडू लागतंय. तर त्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते पाहुयात.

तोंड कडू होण्याची ‘ही’ आहेत कारणं – Bitter taste in the mouth causes and remedies :

धूम्रपान:
तज्ज्ञांच्या मते धूम्रपानामुळे टेस्ट बडवर फरक पडतो. त्यामुळे तुमची चव ओळखण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जिभेला कडू चव येते. म्हणजेच धूम्रपान हे फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या चवीवरही परिणाम करतं.

केमिकलयुक्त हवा शरीरात गेल्यास:
तुम्ही ज्या वातावरणात काम करताय ते वातावरणही तुमच्या चवीवर परिणाम करतं. तुम्ही एखाद्या केमिकलच्या संपर्कात येत असाल, तर काही केमिकल श्वासामार्फत शरीरात जातात आणि त्यामुळे जिभेला कडू चव येते.

मौखिक स्वच्छता न राखणं:
तोंड योग्यप्रकारे स्वच्छ न ठेवल्यानं कडू चव लागते. तोंड स्वच्छ न ठेवल्यानं तुमच्या जिभेवर मृत पेशी, बॅक्टेरिया राहतात, त्यामुळे जिभेच्या चवीवर फरक पडतो. त्यामुळे फक्त दात घासणं नव्हे, तर जीभही स्वच्छ करणं गरजेचं आहे.

दातांच्या समस्या:
मौखिक स्वच्छता न राखल्यानं दातांच्या समस्या निर्माण होतात. दातांच्या समस्या आणि हिरड्यांच्या आजाराची अनेक लक्षणं दिसतात, त्यापैकीच एक आहे तोंडातील कडू चव. त्यामुळे तोंडाला कडू चव लागत असेल तर दातांच्या डॉक्टरांना दाखवा, त्यामुळे दात आणि हिरड्यांच्या आजारांचं निदान होईल.

अॅसिडीटी:
तुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल त्यावेळी तुमच्या जिभेला कडू चव येईल. पोटातील अॅसिड किंवा पोटातील इतर घटक अन्ननलिकेत पुन्हा येतात, तेव्हा कडू चव लागते.

डिहायड्रेशन:
डिहायड्रेशनमुळेही काही वेळा कडू चव लागू शकते. तहान लागल्यानं आणि तोंड सुकल्यानं अशी चव लागते. ही समस्या टाळण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, डिहायड्रेशन होऊ नये यासाठी किमान 8 ग्लास पाणी प्यावं.

श्वसनमार्गात इन्फेक्शन:
खोकला किंवा तापामुळे पदार्थांची चव लागत नाही. काहीवेळा तोंडाला कडू चव येते. याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. श्वसनमार्गातील इन्फेक्शन दूर झाल्यानंतर तोंडाला चवही येते. मात्र खोकला किंवा ताप असताना तोंडाची स्वच्छता राखणं गरजेचं आहे.

तोंडानं श्वास घेणे:
सर्दीनं नाक बंद झाल्यास अनेक जण तोंडावाटे श्वास घेतात. त्यामुळे तोंड कोरडं पडतं परिणामी तोंडाला कडवट चव येते. त्यामुळे पुरेसा आराम करा.

गरोदरपणा:
कडवट चव म्हणजे कदाचित गरोदरपणाही असू शकतो. सर्वसामान्यत: गरोदरपणात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे तोंडाला कडवटपणा येतो. मात्र हा कडवटपणा दूर करता येतो.

तोंडाला कडवट चव येण्याची ही काही कारणं आहेत. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा जिभेतील मज्जातंतूना हानी पोहोचल्यानं, लाळग्रंथींना संसर्ग झाल्यानं, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणामुळेही कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कडवट चव लागत असेल तर डॉक्टरांना दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Bitter taste in the mouth causes and remedies.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x