27 April 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

MPSC State Service Preliminary Exam 2021 | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 जानेवारीच्या 2 तारखेला

MPSC State Service Preliminary Exam 2021

मुंबई, ०४ ऑक्टोबर | महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरतीचं वेळापत्रक एमपीएससीनं (MPSC State Service Preliminary Exam 2021) प्रसिद्ध केलं आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला होणार एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षेच्या तीन महिने आधी एमपीएससीनं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आता एमपीएससीनं 2021 चं वेळापत्रक जाहीर केल्यानं 2022 चं वेळापत्रक कधी जाहीर करणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी आयोगाला केला आहे.

MPSC State Service Preliminary Exam 2021. Under the State Service Examination 2021, recruitment will be done in 16 categories for 290 posts. State Service Pre-Examination will be conducted by MPSC on 2nd January 2022 :

राज्य सेवा परीक्षेचं वेळापत्रक काय?
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MPSC State Service Preliminary Exam 2021 will be on 2nd January 2022.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x