2 May 2024 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राफेल विमान करार: अनिल अंबानींच्या कंपनीचं फ्रान्समधूनच गुपित उघड, मोदी सरकार अडचणीत

नवी दिल्ली : फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल विमान करारासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीचं नाव भारत सरकारनेच सुचवलं होत असा खुलासा केल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. या व्यवहारासंबंधित नेमके हेच आरोप काँग्रेसने केले होते.

फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या सोबत २०१५ मध्ये पॅरिसला सखोल चर्चा करण्यात आली होती. त्या प्राथमिक बोलणीनंतर सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या करारावर अंतिम स्वरूप आलं होत. त्यानुसार खुद्द भारत सरकारकडून ‘रिलायन्स डिफेन्स’ हे एकमेव नाव सुचविण्यात आल्यामुळे फ्रान्स’स्थित “देसॉ एव्हिएशन” या कंपनीकडे दुसरे पर्यायच उपलब्ध नव्हते असा धक्कादायक खुलासा फ्रान्स्वा ओलांद यांनी फ्रान्समधील एका मुलाखतीत केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने या करारासंबंधित आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या सहभागाबाबत खुलासा करताना हा केवळ २ कंपन्यांमधील करार असून त्यात सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण दिल होत. मात्र फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या धक्कादायक खुलाशाने मोदी सरकार तोंडघशी पडलं आहे असं चित्र आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांचा विश्वासघात केला असून त्यांनी भारतीय जवानांच्या रक्ताचा अपमान केला आहे, असा घणाघात केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x